Site icon e लोकहित | Marathi News

महाविकास आघाडी सरकार पडण्यास नाना पटोलेच जबाबदार! शिवसेनेचा मोठा गौप्यस्फोट

Many people are responsible for the fall of Mahavikas Aghadi government! Big secret explosion of Shiv Sena

नाशिक पदवीधर निवडणूकीनंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. काँग्रेसमधील (Congress) अंतर्गत वाद सध्या भडकले असून वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेत्यांनी पटोलेंना धारेवर धरले आहे.

“नोकरीच काहीतरी जुगाड करुन द्या, नाही तर मी पळून जाईल”, तरूणीचं उपमुख्यमंत्र्यांना पत्र

दरम्यान वाहत्या गंगेत हात धुवून घेत आता शिवसेनेने देखील नाना पटोलेंवर ‘सामना’ मधून तोंडसुख घेतले आहे. ‘शिवसेना फुटण्यास नाना पटोलेच जबाबदार होते’ असा गंभीर आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. इतकंच नाही तर नाना पटोले ( Nana Patole) यांच्यामुळे महाविकास आघाडी सरकार पडले असे देखील शिवसेनेने म्हंटले आहे.

महावितरण अधिकाऱ्याशी फाडफाड इंग्रजीमध्ये बोलणाऱ्या शेतकऱ्याला मिळाला मीटर!

नाना पटोले यांनी तडकाफडकी विधानसभा अध्यक्षपद सोडले यामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात आले. त्यावेळी अध्यक्षपदी जर नाना पटोले असते तर अनेक पेच टाळता आले असते. पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना जागेवरच अपात्र करता आले असते, असे म्हणत शिवसेनेने (Shivsena) नाना पटोले यांच्यावरची नाराजी व्यक्त करुन दाखवली आहे.

मुलीच्या लग्नासाठी वडिलांनी मांडला अनोखा थाट; वऱ्हाडी आणले चक्क बैलगाडीमधून!

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. याचा फायदा धोकेबाज आमदारांनी घेतला. यामुळे राज्यात चांगले चाललेले सरकार पडले. हे सत्य नाना पटोले यांनी देखील मान्य करायला हवे. असे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून सांगण्यात आले आहे.

मोठी बातमी! नाना पटोले यांचे प्रदेशाध्यक्ष पद धोक्यात? बाळासाहेब थोरात यांच्या तक्रारीची पक्षश्रेष्ठी दखल घेणार

Spread the love
Exit mobile version