Maratha Aarakshan । मराठा समाजाला सध्याच्या इतर मागासवर्गीय कोट्यात (ओबीसी) आरक्षण देऊ नये, या भूमिकेचा महाराष्ट्र सरकारचे मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी पुनरुच्चार केला. यामुळे सगळीकडे चर्चाना उधाण आले आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या वक्तव्याच्या सगळीकडे चर्चा रंगल्या आहेत. त्याचबरोबर छगन भुजबळ ‘ओबीसी एल्गार’ मेळाव्याला संबोधित करत होते. ते म्हणाले, ‘आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या विरोधात नाही, मात्र ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये. मराठ्यांना वेगळे आरक्षण द्या. असं ते म्हणाले आहेत.
Milind Deora । शिंदे गटातच प्रवेश का? मिलिंद देवरांची पहिली प्रतिक्रिया समोर
त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांच्यावर देखील छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी टीका केली होती. ते (जरांगे) तीन कोटी लोकांसह मुंबईत येणार असल्याचे सांगत आहेत. मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, मग आंदोलन मुंबईकडे का सरकत आहे? असा सवाल भुजबळांनी उपस्थति केला.
Manoj Jarange Patil । मनोज जरांगेंच्या मुंबईतील मोर्चाबाबत संभाजीराजेंचे सर्वात मोठे वक्तव्य!
मराठा आंदोलनावर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
गेल्या शुक्रवारी एका जनहित याचिकाद्वारे मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावरून आंदोलनांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. ही याचिका दाखल होताच उच्च न्यायालयाने त्यावर सुनावणी करण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने सांगितले की, अशा बैठकांच्या परवानगीवर निर्णय घेण्याचा अधिकार हा केवळ अधिकार्यांचा आहे, न्यायालयाचा नाही. न्यायालयाने या सगळ्यात अडकू नये.
Accident News । भीषण अपघात! भरधाव दुचाकीने आईसह सहा महिन्याच्या चिमुरड्याला उडवलं