Maratha Andolan । काल जालन्यामध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनात पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला त्याचबरोबर हवेत गोळीबार देखील केला. यानंतर राज्याचे राजकीय वातावरण देखील चांगलेच तापल्याचे दिसत आहे. अनेकांनी आंदोलकांची भेट घेत जखमी आंदोलकांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. दरम्यान या घटनेबद्दल मी सरकारचा निषेध व्यक्त करत असल्याचे वक्तव्य संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी केले आहे.
Delhi Crime । राजधानी दिल्ली हादरली! तरुणाने वृद्ध महिलेवर अत्याचार करून कापले ओठ
ज्या माणसाने अंतरवाली सराटी गावात हे कृत्य करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचे निलंबन झाल्याशिवाय मी गप्प बसणार नसल्याचे संभाजी महाराज म्हणाले आहेत. त्याचबरोबर मराठ्यांवर गोळी घालायची असेल तर पहिली गोळी माझ्यावर घाला असे देखील वक्तव्य संभाजी महाराज यांनी केला आहे. (Maratha Andolan)
Rain in Maharashtra । राज्यात पावसाचे दमदार आगमन, ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस
त्याचबरोबर संभाजी महाराज पुढे बोलताना म्हणाले, तुमचे सरकार दिल्लीत आहे त्याचबरोबर महाराष्ट्रात देखील आहे. त्यामुळे आम्हाला सांगा आता किती दिवस आरक्षणाचा लढा द्यायचा असे ते म्हणाले आहेत. त्याचबरोबर आरक्षण कधी देणार ते पहिले सांगा. आंदोलकांवर गोळ्या घालायला हे काय पाकिस्तानचे लोक आहेत का? ते काही दहशतवादी आहेत का? असा सवाल देखील संभाजीराजेंनी यावेळी उपस्थित केला आहे.
आंदोलन करणारे सर्वलोक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचे असल्याचे देखील संभाजी महाराज यावेळी म्हणाले आहेत. मी कधीच राजकारण केले नाही मी समाजकारण केल आहे, गरीब मराठा समाजाला कधी न्याय मिळवून देणार हे पहिलं सांगा असं देखील संभाजी महाराज म्हणाले आहेत.
Load Shedding । राज्यात पुन्हा लोडशेडिंग! दररोज ‘इतके’ तास गायब होणार वीज