Maratha Aarakshan । मराठा समाजाच्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या? पाहा संपूर्ण यादी

Maratha Aarakshan

Maratha Aarakshan । सध्या मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha reservarion) एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने मध्यरात्री अध्यादेश काढले असून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मोठे यश आले आहे. त्यामुळे मराठा बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मराठा समाजाच्या कोणत्या मागण्या (Maratha Community Reservation Demand) मान्य झाल्या आहेत, जाणून घेऊयात. (Latest marathi news)

Manoj Jarange । सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

मराठा समाजाच्या मान्य झाल्या ‘या’ मागण्या

  • नोंदी मिळाल्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार
  • राज्यभरात ५७ लाख नोंदी मिळाल्या आहेत. आतापर्यंत ३७ लाख लोकांना प्रमाणपत्र दिले गेले आहे. याचा डेटा मराठा समाजाला मिळणार.
  • सगे सोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळणार
  • शिंदे समिती रद्द होणार नाही
  • अंतरवाली सराटीसह मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे
  • मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती होणार नाही. समजा भरती केलीच, तर मराठा समाजाच्या जागा राखीव ठेवणार
  • आरक्षण मिळेपर्यंत आणि मराठा समाजातील सर्वांना शंभर टक्के शिक्षण मोफत मिळणार
  • ज्या महाराष्ट्राच्या मराठ्यांकडे कुणबीची नोंद नाही, त्या बांधवांना मोफत शपथपत्र करुन मिळणार

Maratha Reservation । ब्रेकिंग! सरकारकडून मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्या मान्य, मुंबईत मराठ्यांचा जल्लोष; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जरांगे पाटील सोडणार उपोषण

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी सकाळी नवी मुंबईतील वाशीमध्ये दाखल होतील आणि त्यांच्या उपस्थितीतमध्ये मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार आहेत. यानंतर वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक मोठी विजयी सभा देखील मनोज जरांगे पाटील घेणार आहेत.

Bull Attack Video । हृदयद्रावक घटना! मॉर्निंग वॉकला गेलेल्या वृद्धावर बैलाचा हल्ला, आजोबा जागीच ठार; पाहा भयानक व्हिडीओ

Spread the love