
Eknath Shinde । मुंबई : मराठा समाज सध्या आरक्षणावरून चांगलाच आक्रमक झाला आहे. त्यावरून सरकारची कोंडी होत आहे. नुकतेच उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आंदोलन मागे घेत सरकारला २ जानेवारीपर्यंतची वेळ दिली आहे. या वेळेत सरकार कोणता निणर्य घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अशातच आता शिंदे सरकारकडून मराठा समाजातील (Maratha Reservation Protest) विद्यार्थ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. (Latest Marathi News)
Urfi Javed । उर्फी जावेदला अटक? पोलिसांनी केली मोठी कारवाई; नेमकं प्रकरण काय?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांसह एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत मराठा समाजातील (Maratha Reservation) विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी विभागाने भाडेतत्वावर जागा घेऊन तात्काळ वसतीगृहे सुरू करण्याचे निर्देश देऊन त्याबाबतचा प्रत्येक आठवड्याला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. बैठक संपल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे.
“मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे आणि नाशिक या जिल्ह्याच्या ठिकाणी प्रति वर्ष प्रति विद्यार्थी ६० हजार रुपये निर्वाह भत्ता, विभागीय ठिकाण, विभागीय मुख्यालय व ‘क’ वर्ग महापालिका असलेल्या जिल्ह्यांमध्ये प्रति वर्ष ५१ हजार रुपये निर्वाहभत्ता दिला जाईल. इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी ४३ हजार रुपये निर्वाहभत्ता तसेच तालुक्याच्या ठिकाणी ३८ हजार रुपये निर्वाह भत्ता दिला जाईल”, अशी माहिती देखील एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.