
Maratha Reservation । मराठा समाजाला आरक्षण (Reservation for Maratha community) देण्यासाठी आज विशेष अधिवेशन सुरु आहे. यामुळे या अधिवेशनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या अधिवेशनात नेमका काय निर्णय होणार? हे पाहणं आता महत्वाचे ठरणार आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा समाजाला किती टक्के आरक्षण द्यायचे ते ठरले आहे. (Latest marathi news)
मराठा आरक्षणच्या मसुद्याला मंत्रिमंडळात मंजुरी मिळाली आहे. राज्य सरकारकडून राज्य मागासवर्गाचा अहवाल मंजूर केल्याची माहिती समोर आली आहे. या अहवालात मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास ठरवले आहे. समाजाला १० टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे मराठा समाजाला काहीसा दिलासा मिळाला आहे.
भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 30 च्या खंड एकमध्ये निर्दिष्ट केलेल्या अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्था व्यतिरिक्त इतर शैक्षणिक संस्था आणि खाजगी शैक्षणिक संस्था मग त्या राज्याकडून अनुदान प्राप्त असो किंवा अनुदान प्राप्त नसो यांमधील प्रवेशाचे एकूण जागांच्या दहा टक्के आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील आणि पदांवरील सरळ सेवा भरतीचे एकूण नियुक्तांच्या दहा टक्के आरक्षण सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गासाठी स्वतंत्रपणे राखून ठेवले जाणार आहे.