Maratha Reservation । धक्कादायक बातमी! दोन मुलांचा विचार न करता ३० वर्षीय तरुणाने मराठा आरक्षणासाठी दिला जीव

Maratha Reservation

Maratha Reservation । मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून संपूर्ण मराठा बांधव एकवटला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यानंतर आता गावागावात अनेक मराठा बांधव आंदोलन करू लागले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मागच्या काही दिवसापासून अनेकजण आत्महत्या करत असल्याच्या देखील घटना घडत आहेत. सध्या देखील जालना जिल्ह्यातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एका ३० वर्षे तरुणाने विहीरीत उडी घेऊन आपला जीव दिला असल्याची माहिती समोर आली आहे. (Maratha Reservation)

Maratha Reservation । मराठा आरक्षणाबाबत इंदुरीकर महाराजांनी घेतला आजवरचा सर्वात मोठा निर्णय!

माहितीनुसार, सोमवारी सायंकाळच्या सुमारास घटना घडली असून स्वपान बाबुराव कचरे असे आत्महत्या करणारा तरुणाच नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली आहे केली जात आहे. जालना तालुक्यातील कचरेवाडी या ठिकाणचा स्वपान रहिवासी होता. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी स्वपान गेल्या काही दिवसापासून आंदोलन करत होता मात्र मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावल्याची माहिती त्याला मिळतात तो अस्वस्थ झाला आणि त्याने जीवन यात्रा संपवण्याचा निर्णय घेतला.

Andhra Pradesh Train Accident । मोठी बातमी! आंध्र प्रदेशमध्ये रेल्वेचा भीषण अपघात; दोन गाड्या एकमेकांवर आदळल्या; अनेकजण गंभीर जखमी

आरक्षणाची सतत मागणी करून देखील सरकार कोणताच निर्णय घेत नसल्याने स्वपान निराश झाला आणि याच नैराश्यातून त्याने टोकाची भूमिका घेत शेतामधील विहिरीत उडी घेऊन जीव दिला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मराठा बांधवांसाठी आणि स्थानिक पोलिसांनी धाव घेतली. यानंतर त्याचा मृतदेह विहिरी मधून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. माहितीनुसार स्वपानचे लग्न झालेले असून त्याला एक सहा वर्षाची मुलगी आणि चार वर्षाचा मुलगा आहे.

Eknath Shinde । एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का! मराठा आरक्षणासाठी खासदारांनी दिला राजीनामा

Spread the love