Maratha Reservation । सध्या मराठा आरक्षणासंदर्भात एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. मध्यरात्री सरकारने अध्यादेश काढले आहेत त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मोठे यश आले असून मराठा बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं, त्याचबरोबर मराठा आंदोलकांवरील गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत, यासाठी मनोज जरांगे पाटील मागच्या ५ महिन्यांपासून आंदोलन करीत होते. त्यांनी आंदोलनाला सुरवात त्यांच्या गावापासून म्हणजेच आंतरवली सराटी या ठिकाहून.. यानंतर सरकारने त्यांना वेळ मागितला त्यांनी देखील वेळ दिला होता मात्र वेळ देऊनही सरकारने मागण्या मान्य केल्या नव्हत्या त्यामुळे त्यांनी मुंबईमध्ये आंदोलन करण्याचा इशारा दिला आणि आता सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत.
Manoj Jarange । मनोज जरांगेंच्या ‘या’ ७ मागण्या तुम्हाला माहिती आहेत का? वाचा एका क्लिकवर
माहितीनुसार, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी सकाळी नवी मुंबईतील वाशीमध्ये दाखल होतील आणि त्यांच्या उपस्थितीतमध्ये मनोज जरांगे पाटीलउपोषण सोडणार आहेत. यानंतर वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक मोठी विजयी सभा देखील मनोज जरांगे पाटील घेणार आहेत.
Manoj jarange Patil । “…तोपर्यंत मुंबईतून जाणार नाही, जरांगेंकडून सरकारला पुन्हा अल्टिमेटम