Maratha Reservation । राज्यभर सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगला तापला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालन्याचे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत आरक्षण देणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका जरांगे पाटलांनी स्पष्ट केलेले आहे. त्यांना मराठा समाजाचा मोठा प्रतिसाद देखील मिळत आहे. अनेक ठिकाणी मराठा समाज आंदोलने देखील करत आहे. दरम्यान बीडच्या वाहिरा या ठिकाणी देखील एका तरुणाने मराठा आरक्षणाच्या मागणीसह गावातील विविध मागण्यांसाठी आष्टी तालुक्यातील कासार गावातील जिओच्या टॉवरवर चढून बसला असल्याची माहिती समोर आली आहे. (Beed News)
Anil Parab । “…त्यामुळे भाजपने राष्ट्रवादी फोडली”, अनिल परब यांच्या दाव्याने खळबळ
मागच्या दोन दिवसापासून हा तरुण टॉवरवर बसला आहे मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने या तरुणाचे रात्री देखील हे आंदोलन सुरूच आहे. अशोक माने असे आंदोलन करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या तरुणाने वाहिरा गावातील काही समस्या तसेच मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी कालपासूनच टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे. वाहिरा गावातील रस्ता आणि इतर समस्या बाबत सरकार गंभीर नसल्याचे या तरुणाचे म्हणणे आहे.
मागच्या एक वर्षापासून जिल्हाधिकारी त्याचबरोबर मुख्यमंत्री यांना विविध समस्यांचे निवेदन देऊन देखील त्याची कोणतीच गांभीर्याने दखल घेतली जात नाही. त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा प्रश्न देखील मार्गी लागत नाही. त्यामुळे या तरुणांनी संतप्त होत टॉवरवर चढून थेट आंदोलन सुरू केले आहे.
या तरुणाचे मागच्या दोन दिवसापासून आंदोलन सुरू आहे. मात्र प्रशासनातील कोणत्याच अधिकाऱ्याने माझ्याकडे लक्ष दिले नाही मी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून त्यांनी देखील माझ्या आंदोलनाची दखल घेतली नाही यामुळे आता जर मी काही केलं तरी याला मुख्यमंत्री आणि बीड जिल्हाधिकारी जबाबदार असतील असा गंभीर इशारा देखील या तरुणाने दिला आहे.