Maratha Reservation । मोठी बातमी! मराठा आरक्षणाचा आकडा ठरला

Maratha Reservation

Maratha Reservation । मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी करत आहेत. ओबीसी नेत्यांनी विशेषतः छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. आंदोलनामुळे मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्यांच्या निशाण्यावर छगन भुजबळ आहेत. दरम्यान आता मराठा आरक्षणाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने (State Govt) मराठा आरक्षणाचा मसुदा तयार केल्याची माहिती समजत आहे.

Eknath Shinde । महाविकास आघाडी का सोडली? अखेर एकनाथ शिंदे यांनी सांगितलं खरं कारण

माहितीनुसार, मराठा आरक्षणाचा मसुदा तयार झाला असून हा मसुदा तयार करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींची घेण्यात आली होती. कोर्टात नवा कायदा टिकेल असं तज्ञांचं मत आहे. महाराष्ट्रामध्ये कुणबी वगळून आता 32 टक्के मराठा समाज असल्याचं अहवालात म्हटलं गेलं आहे. त्यामुळे मराठा समाजाला 13 टक्के आरक्षण मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Suhani Bhatnagar Death । मनोरंजनविश्वावर शोककळा! दंगल फेम अभिनेत्रीचं निधन, धक्कादायक कारण आलं समोर

20-21 फेब्रुवारीला विधानसभेचे विशेष अधिवेशन

सरकारने मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी काढलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी आणि त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार शासनाने 20 व 21 तारखेला विशेष अधिवेशन बोलावले आहे. हे अधिवेशन बोलावताना मुख्यमंत्र्यांनीही मध्यममार्ग काढला आहे.

Congress । काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का? बड्या नेत्याच्या मुलाने बदललं सोशल मीडियावरील प्रोफाईल, होणार भाजपमध्ये प्रवेश?

Spread the love