Maratha Reservation । सध्या मराठा आरक्षणासंदर्भात एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे.महाराष्ट्रामध्ये समाजाला स्वतंत्र आरक्षण लागू करण्यासाठी मराठा समाज हा मागास आहे, हे महाराष्ट्र सरकारला सुप्रीम कोर्टात सिद्ध करावं लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. मराठा आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आली आहे. मराठा समाजाला आरक्षणासाठी ही शेवटची संधी असणार असून राज्य सरकार देखील या प्रकरणात अतिशय महत्त्वाची पावलं टाकत आहे.
Sharad Pawar । ब्रेकिंग! शरद पवार यांना सर्वात मोठा धक्का!
माहितीनुसार, सुप्रीम कोर्टामध्ये मराठा समाज मागास आहे हे सिद्ध न झाल्यामुळे हे आरक्षण टिकलं नाही. मात्र आता क्युरेटिव्ह पिटीशनच्या सुनावणीवेळी सरकार पुराव्यानिशी मराठा समाज मागास असल्याचं सिद्ध करण्याच्या तयारीत आहे. याबाबत एक अहवाल देखील तयार करण्यात आला आहे. हा अहवाल मराठा समाजाच्या बाजूने असल्याची माहिती एका मराठी वृत्तवाहिनीला सूत्रांकडून मिळाली आहे.
NCP MLA Disqualification । मोठी बातमी! राष्ट्रवादी अजितदादांचीच, विधानसभा अध्यक्षांचा निकाल
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस असून त्यांची प्रकृती ढासळल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी उपचार घेण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. अंतरवाली सराटी या ठिकाणी अनेक महिला जमल्या असून त्यांनी उपचार घ्यावे आणि सरकारने जरांगे यांच्या मागण्यांचा विचार करावा अशी मागणी केली आहे.
Yuvraj Pathare । मोठी बातमी! शिवसेना नगरसेवकावर प्राणघातक हल्ला