
Maratha Reservation Bill । अखेर राज्य मागासवर्गाचा अहवाल समोर आला आहे. या अधिवेशनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. मराठा समाजाला (Maratha Reservation) किती टक्के आरक्षण द्यायचे ते ठरले आहे. या अहवालात मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण मिळणार असल्याची तरतूद आहे. यावर आता अनेकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. (Latest marathi news)
Rituraj Singh । मनोरंजन विश्वाला मोठा धक्का! ऋतुराज सिंह यांचं निधन
दरम्यान, भरती प्रक्रियेत मराठा आरक्षणाचा फायदा होणार का? असा सवाल अनेकांना पडत आहे. दरम्यान, आधी सुरू झालेल्या भरती, आणि इतर पदांसाठी जागा भरती सुरू झाली आहे त्यात मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही अशी नोंद या विधेयकात नमुद केलं आहे.
काय सांगते विधेयक?
(१) या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी ज्या प्रकरणी, अगोदर निवड प्रक्रिया सुरू केली असेल, त्या प्रकरणांना, या अधिनियमाच्या तरतुदी लागू असणार नाहीत, आणि अशा प्रकरणांच्या बाबतीत, अशा प्रारंभापूर्वी कायद्याच्या ज्या तरतुदी लागू होत्या आणि जे शासकीय आदेश लागू होते, त्यानुसार कार्यवाही केली जाईल.
Maratha Reservation । सर्वात मोठी बातमी आली समोर! मराठा समाजाला इतके टक्के आरक्षण मिळणार
स्पष्टीकरण – या कलमाच्या प्रयोजनार्थ, जेव्हा संबंधित सेवा नियमांन्वये, –
(एक) केवळ लेखी चाचणीच्या किंवा मुलाखतीच्या आधारे, भरती करायची असल्यास आणि अशी लेखी चाचणी किंवा, यथास्थिति, मुलाखत सुरू झाली असेल; किंवा
(दोन) लेखी चाचणी व मुलाखत या दोन्हीच्या आधारे भरती करावयाची असेल आणि अशी लेखी चाचणी सुरू झाली असल्यास त्याबाबतीत, निवड प्रक्रिया सुरू झाली असल्याचे मानले जाईल.
(२) या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी, ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये किंवा ज्या प्रकरणी, अगोदरच प्रवेश प्रक्रिया सुरू केली असेल अशा संस्थांमधील किंवा प्रकरणांमधील प्रवेशांना, या अधिनियमाच्या तरतुदी लागू नसणार.अशा प्रकरणांच्या बाबतीत, अशा प्रारंभापूर्वी, कायद्याच्या ज्या तरतुदी लागू होत्या आणि जे शासकीय आदेश लागू होते, त्यानुसार कार्यवाही केली जाईल.
स्पष्टीकरण. – या कलमाच्या प्रयोजनार्थ, जेव्हा,- (एक) कोणत्याही प्रवेश चाचणीच्या आधारे प्रवेश द्यावयाचा असल्यास आणि अशी प्रवेश चाचणीची प्रक्रिया सुरू झाली असेल; किंवा
(दोन) प्रवेश चाचणीच्या आधारे असेल त्याव्यतिरिक्त प्रवेश द्यायाचा असल्यास त्याबाबतीत, अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक समाप्त झाला असल्यास तर त्याबाबतीत, प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असल्याचे मानले जाईल.