Maratha Reservation । ब्रेकिंग! मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार? काही तासातच विशेष अधिवेशनाला सुरवात होणार

Maratha Aarakshan

Maratha Reservation । मराठा समाजच्या आरक्षणाचा प्रश्न अजूनही मार्गी लागलेला नाही. मराठा समाजाच्या आरक्षांबाबतच्या सर्व मागण्या सरकारने मान्य कराव्या यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. सरकारने मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावणार असल्याची घोषणा केली होती. दरम्यान आता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने मंगळवारी विशेष अधिवेशन बोलावलं आहे.

Sangli Accident । क्षणात होत्याच नव्हतं झालं..! कारच्या भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

पुढील काही तासांत हे अधिवेशन सुरु होणार असून हे विशेष अधिवेशन महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक असेल. कारण, मराठा समाजाला किती टक्के आरक्षण मिळणार, याबाबतचा या अधिवेशनात निर्णय होणार आहे. त्यामुळे या अधिवेशनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. (Maratha Reservation)

Kamal Nath । सर्वात मोठी बातमी! कमलनाथ भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांवर काँग्रेसच्या बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावलं असून यामध्ये टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीतलं मराठा आरक्षण देण्यासंदर्भात आणि कुठल्याही समाजावर अन्याय न होता मराठा समाजाला आरक्षण मिळेल. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आज नेमकं काय होतं? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Supriya Sule । सुप्रिया सुळे यांनी केला धक्कादायक गौप्यस्फोट; म्हणाल्या, “शरद पवारांना राजकारणातून…”

Spread the love