Maratha Reservation । मराठा आरक्षणाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात गदारोळ सुरू आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रात अनेक मराठा संघटना सातत्याने आंदोलन करत आहेत. आता एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मराठा आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. माध्यमांना माहिती देताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल सरकारला सादर केला आहे.
समितीचा हा अहवाल २० फेब्रुवारीला सभागृहात मांडला जाणार आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण मिळेल, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. आरक्षणाबाबत माहिती देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, यापूर्वीही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते, मात्र ते न्यायालयात टिकले नाही. मराठा समाजाला आता कायद्याच्या आधारे असे आरक्षण देणार आहोत. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातही हे आरक्षण कायम राहणार आहे.
Chhagan Bhujbal । मनोज जरांगेंबाबत छगन भुजबळ यांचे सर्वात मोठे वक्तव्य!
मराठा समाजाचे सर्वेक्षण करून अहवाल तयार केला
एकनाथ शिंदे म्हणाले की, समितीने रात्रंदिवस काम करून हा अहवाल तयार केला आहे. या अहवालात २.२५ कोटी मराठा लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शिंदे म्हणाले, या अहवालाच्या अंमलबजावणीनंतर मराठा समाज शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत होईल, अशी आशा आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्यात आपण यशस्वी होऊ, असेही ते म्हणाले. 20 फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे.