Maratha Reservation । आज आरक्षण नाही दिलं तर उद्या…; अधिवेशन सुरु होण्याआधी जरांगे पाटलांचा सरकारला गंभीर इशारा

Manoj Jarange Patil

Maratha Reservation । मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आज विशेष अधिवेशन होणार आहे. यामुळे या अधिवेशनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या अधिवेशनात नेमका काय निर्णय होणार? हे पाहणं आता महत्वाचे ठरणार आहे. हे अधिवेशन काही तासातच सुरु होणार आहे मात्र त्याआधीच मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पत्रकार परिषद घेतली.

Maratha Reservation । ब्रेकिंग! मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार? काही तासातच विशेष अधिवेशनाला सुरवात होणार

पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, ” आज होणाऱ्या विशेष अधिवेशनामध्ये सरकारने मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घ्यावा. सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी त्यांनी केली. सगेसोयरे अंमलबजावणी आधी करावी. मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार आरक्षण दुसऱ्या सत्रात घ्यावं. असं देखील मनोज जरांगे म्हणाले आहेत.

Sangli Accident । क्षणात होत्याच नव्हतं झालं..! कारच्या भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

त्याचबरोबर ज्या मराठा बांधवांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्या आरक्षणासाठी सरकारने अधिसूचना काढली होती. त्याची देखील अंमलबजावणी करावी. सगळे आमदार, मंत्री यांनी हा विषय लावून धरावा, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहे. त्यामुळे या अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी मनोज जरांगे यांनी सरकारला गंभीर इशारा देखील दिला आहे. आता ही सरकारला शेवटची संधी आहे, आरक्षण नाही दिलं तर पश्चतापाची वेळ येईल. असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

Kamal Nath । सर्वात मोठी बातमी! कमलनाथ भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांवर काँग्रेसच्या बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य

Spread the love