Maratha Reservation । मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासह गावागावातील मराठा समाजाने उपोषण सुरू केले आहे. गावांमध्ये नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर जर कोणी नेते गावात आले तर त्यांची वाहने अडवली जात आहेत. अनेक ठिकाणी मोर्चे काढले जात आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक वाहनांची तोडफोड देखील केली जात आहे. मराठा आंदोलन दिवसेंदिवस उग्र होत असतानाच आता यामध्ये प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी उडी घेतली आहे. मराठा आंदोलकांना पाठिंबा देताना इंदुरीकर महाराजांनी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे.
इंदुरीकर महाराजांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला असून त्यांनी उद्यापासून पाच दिवस कोणतेही कार्यक्रम न करण्याचा आणि कीर्तन न करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून इंदुरीकर महाराजांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे उद्यापासून पुढील पाच दिवस त्यांचे कोणतेही कार्यक्रम होणार नसल्याची माहिती देखील मिळत आहे.
Eknath Shinde । एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का! मराठा आरक्षणासाठी खासदारांनी दिला राजीनामा
विखे पाटील यांचा दौरा रद्द
अहमदनगर मधील एनआर लॉन्स या ठिकाणी प्राथमिक शिक्षक संघटनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी मंत्री गिरीश महाजन, दीपक केसरकर आणि राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहणार होते. मात्र मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनी त्यांचा दौरा रद्द केल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
Ajit Pawar Dengue । मोठी बातमी! अजित पवार यांना डेंग्यूची लागण