
Maratha Reservation । मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रातील राजकारण आता अधिकच तापले आहे. यावरून आता शिंदे गट आणि अजित पवार गट आमनेसामने आले आहेत. महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्यास विरोध केला. त्यांनी सरकारला इशारा देत ओबीसींवरील अन्याय सहन करणार नसल्याचे सांगितले. गरज पडली तर सरकारमध्ये राहूनही लढू. असं छगन भुजबळ म्हणाले. (Chhagan Bhujbal)
Bjp । निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का! आमदाराची तब्येत खालावली
छगन भुजबळ यांच्या या वक्तव्यावर मंत्री आणि शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई म्हणाले की, छगन भुजबळांनी असे वक्तव्य करू नये. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होईल. त्याचबरोबर पुढे शंभूराज देसाई म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच कोणाचेही आरक्षण हिसकावून इतर कोणत्याही वर्गाला दिले जाणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले आहे.
Crime News । धक्कादायक! महिलांवर अश्लील व्हिडीओ तयार करण्यासाठी जबरदस्ती? 3 अभिनेत्यांना अटक
छगन भुजबळ संभ्रम पसरवण्याचे काम करतायेत
शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी छगन भुजबळांच्या भूमिकेचा निषेध केला आहे. ते पुढे म्हणाले की, भुजबळ साहेबांनी संभ्रम पसरवण्याचे काम केले आहे. भुजबळांनी आरक्षणाबाबत केलेले विधान 100 टक्के चुकीचे आहे. ओबीसी आरक्षणाला हात न लावता आम्ही आरक्षण देणार आहोत. भुजबळ साहेब श्रेय घेण्यासाठी अशी विधाने करत आहेत.
Chhagan Bhujbal । आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी
अजित पवारांची भेट घेणार
छगन भुजबळ यांच्या वक्तव्याबाबत आपण अजित पवार यांची भेट घेणार असल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितले. अजित पवार यांनी त्यांच्या मंत्र्यांना समजावून सांगावे की, त्यांनी असे कोणतेही विधान करू नये, ज्यामुळे राज्यात गोंधळ निर्माण होईल. देसाई म्हणाले की, प्रक्षोभक विधाने करून माध्यमांचे लक्ष वेधून घेणे ही भुजाबळांची जुनी सवय आहे. असं म्हणत शंभूराज देसाई यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे.