Maratha Reservation । मराठा क्रांती मोर्च्याच्या तरुणांनी काल सकाळी अॅड. गुणरत्न सदावर्तें (AD. Gunratne Sadavarte) यांच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. यानंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली. एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत मराठा क्रांती मोर्चाच्या (Maratha Kranti Morcha) तरुणांनी मुंबईतील क्रिस्टल टॉवर परिसरातील गाड्या फोडल्यात.
यानंतर या प्रकरणी पोलिसांनी मंगेश साबळे, वसंत बनसोडे, राजू सावे या आरोपींना ताब्यात घेतलं. मात्र त्यानंतर काही तासातच त्यांची जामिनावर सुटका देखील करण्यात आली. जामिनावर सुटका झाल्यानंतर यामधील मंगेश साबळे या तरुणाने एका मराठी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणाला गालबोट लावण्याचा हेतू नव्हता असा दावा साबळे यांनी केला आहे.
याबाबत बोलताना साबळे म्हणाले, मराठा समाजाचं आंदोलन शांततेत सुरु आहे. या आंदोलनाला गालबोट लावण्याचा आमचा प्रयत्न नाही. मात्र मराठा समाजाला मी आरक्षण मिळूच देणार नाही, मराठा समाजाची सभा ही जत्रा आहे असं, सतत बोलून आमच्या भावना दुखावण्याचं काम गुणरत्न सदावर्ते करतात आहेत. त्यामुळे या व्यक्तीला चाप लावण्याचं काम आम्ही केल आहे. असं मंगेश साबळे यांनी म्हटल आहे.
Accident News । भीषण अपघात! ट्रक आणि कारची धडक, १२ जण जागीच ठार