Site icon e लोकहित | Marathi News

Manoj Jarange Patil । मागण्या मान्य झाल्यानंतर जरांगे पाटील भावुक, म्हणाले; “मराठ्यांच्या लेकरांना आज… “

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil । राज्य सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य (Maratha reservation protest) केल्या आहेत. आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते जीआर स्वीकारत आंदोलन मागे घेतले आहे. आज ते मान्य केलेल्या मागण्यांचा अध्यादेश घेऊन आपल्या गावी म्हणजेच अंतरवाली सराटी येथे परतत आहेत. यावेळी त्यांनी आपल्या कुटुंबियांशी फोनवरून संवाद साधला. (Latest marathi news)

Eknath Shinde । मराठा आरक्षणासाठी मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! मिळाणार ‘या’ सुविधा

‘आज मराठ्यांच्या लेकरांना न्याय मिळाला’, असं म्हणताना जरांगे पाटील यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. मी अगोदर समाजाचा आहे, नंतर माझ्या कुटुंबाचा आहे. सर्व समाज आंतरवाली येथे जमा होणार असून कुटुंबापाशी गेल्यावर थोडी माया निर्माण होते. पण ध्येयापासून मन विचलित होण्याची शक्यता असते. त्यामुळे एकदा घराच्या बाहेर पाय टाकला तर पुन्हा मागे वळून पाहायचं नाही,’ असे जरांगे पाटील म्हणाले. (Maratha reservation update)

Chhagan Bhujbal । छगन भुजबळांची मराठा आरक्षणाच्या अध्यादेशावर नाराजी, कोर्टात जाण्याची तयारी

“दरम्यान, आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना आपण वाऱ्यावर सोडणार नाहीत. लवकरच त्यांना नोकऱ्या देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. त्यांना मोबदला, नुकसानभरपाई म्हणून ८० लोकांना चार लाख रुपयांप्रमाणे आर्थिक मदत देण्यात येईल. हे सरकार सर्वसामान्याचं सरकार असून गुन्हे मागे घेण्याचे आणि इतर निर्णयांची पूर्ण अमलबजावणी होईल,” असा शब्द शिंदे यांनी दिला आहे.

Maratha reservation । मराठा आरक्षणावर ओबीसी नेत्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले; ‘जरांगे पाटील तहामध्ये हरले’

Spread the love
Exit mobile version