maratha reservation | मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि अधिसूचनेचे कायद्यामध्ये रूपांतर व्हावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. आंतरवाली सराटी या ठिकाणी १० तारखेपासून जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती अत्यंत खालावल्याची माहिती समोर आली आहे.
Abhishek Ghosalkar Firing । अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात समोर आली धक्कादायक माहिती!
अनेक जणांनी विनंती करूनही मनोज जरांगे पाटील यांनी अन्न, पाणी आणि औषधही घेतलेले नाही. अन्न, पाणी आणि औषध न घेतल्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर मोठा विपरीत परिणाम होत आहे. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. नाकातून रक्तस्राव होत असला तरी जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.
Maratha Reservation । “माझा जीव गेल्यावर…”, मनोज जरांगे यांचा सरकारला गंभीर इशारा
सगे-सोयरे कायद्याच्या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत चिंताजनक होत असल्याने त्याचे पडसाद राज्यभरात उमटायला सुरुवात झाली आहे. काल रात्री जालना-जळगाव रोडवर टायर जाळून याचा निषेध करण्यात आला आहे. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड मध्ये मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ एक मोठी रॅली देखील काढण्यात येणार आहे.
Sanjay Shirsath । ब्रेकिंग! संजय राऊतही सोडणार ठाकरेंची साथ? बड्या नेत्याचा दावा