Maratha Reservation । मागच्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला चर्चेत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालन्यातील मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले होते. मात्र आता त्यानंतर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज जालना या ठिकाणी त्यांची भव्य अशी जाहीर सभा होणार आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील हे भाषण देखील करणार आहेत. दरम्यान या सभेला मोठा प्रतिसाद मिळत असून या सभेसाठी राज्यभरातून मराठा बांधव आंतरवाली सराटी गावात दाखल होत आहेत.
आतापर्यंत देशांमध्ये कुठेही एवढी गर्दी झाली नसेल एवढी गर्दी या सभेला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ही सभा आज इतिहास घडवणार असल्याचे देखील बोलले जात आहे. मात्र आज होणाऱ्या सभेमध्ये मनोज जरांगे पाटील नेमकं काय बोलणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कितीही गर्दी झाली तरी मराठ्यांनो आता घरी थांबू नका कार्यक्रमाला या आणि एकजूट दाखवून द्या असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
या सभेची जोरदार तयारी करण्यात आली असून जवळपास 5000 स्वयंसेवक यासाठी तैनात करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून, दवाखाना, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृहांची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. याच संदर्भामध्ये पोलिसांनी देखील सुरक्षा संदर्भात आढावा बैठक घेतली आहे. या सभेसाठी धुळे-सोलापूर महामार्गावरची वाहतूक तीन वेगळ्या मार्गांनी वळवण्यात आली आहे.
Gopichand Padalkar । सर्वात मोठी बातमी! गोपीचंद पडळकर यांच्या जीवाला धोका; स्वतःच दिली माहिती