
Maratha Reservation । सध्या राज्यभर मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला चर्चेत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आता मराठा बांधव एकवटल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान मराठा समाजासाठी आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. कारण मराठा आरक्षण वैध की अवैध? याचा अंतिम फैसला आज होणार आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये क्यूरेटिव्ह याचिका दाखल केली होती. यावर आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. (Latest Marathi News)
सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या पीठापुढे ही सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणी नेमका काय निर्णय? होणार याकडे संपूर्ण मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी राज्यात सुरू असलेली आंदोलने आणि मनोज जरांगे पाटील यांच्या इशाऱ्यानंतर राज्य सरकारने शेवटचा प्रयत्न म्हणून सुप्रीम कोर्टात क्यूरेटिव्ह याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे. यामध्ये आता सुनावणीत काय घडेल? मराठा आरक्षणाबाबत नेमका काय निर्णय होईल? मराठा आरक्षण वैध की अवैध? या सर्व गोष्टींकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.