
Maratha Reservation । सरकारने अजूनही मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) कोणतीच दखल घेतली नाही. मराठा आरक्षणाच्या मागण्या अजूनही मान्य झालेल्या नाहीत. यामुळे आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे २० जानेवारीला मुंबईमध्ये मोठं आंदोलन करणार आहेत. असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्यानंतर मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईत आंदोलन करू नये म्हणून सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी याचिका दाखल केली आहे. मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलन करू नये अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. यावर आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता मुंबई हायकोर्ट काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.
Devendra Fadnavis । ब्रेकिंग! “…तर तलाठी भरती परीक्षा रद्द करू” देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी आंतरवाली सराटी या गावातून आंदोलन सुरू केलं होतं. यानंतर सरकारने त्यांना काही आश्वासने दिली त्यानंतर त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले मात्र आंदोलन मागे घेऊनही सरकारने आश्वासन पूर्ण केले नाही. यामुळे त्यांनी २० जानेवारीला पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Bus Accident । प्रवाशांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात, अनेकजण गंभीर जखमी