Maratha Reservation । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. जालना (Jalna) जिल्ह्यात शेकडो मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल केल्याची बातमी समोर आली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. काल मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणसाठी मराठा बांधवांकडून जिल्ह्याजिल्ह्यात रास्तारोको करण्यात आला होता. (Politics News)
Supriya Sule । “देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांना…” सुप्रिया सुळे यांचे सर्वात मोठे वक्तव्य
अनेक ठिकाणी काल रास्तारोको करण्यात आला. यावेळी रास्तारोको करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. जालना जिल्ह्यात शेकडो मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. माहितीनुसार, हसनाबाद 15, भोकरदनमध्ये 70, बदनापूरमध्ये 100 पेक्षा अधिक, परतूरमध्ये 9 गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
रास्तारोको करणाऱ्या आंदोलकांनी काही भागात पोलिसांना धक्काबुक्की केल्याचे प्रकार देखील उघडकीस आले आहेत. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत शेकडो मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत.