Maratha Reservation | सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर चांगला चर्चेत असून आरक्षणाबाबत अद्याप सरकारकडून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे मराठा आंदोलक अधिकच आक्रमक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. 20 जानेवारीला मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. या ठिकाणी मोठे आंदोलन करणार असल्याची माहिती मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.
Sharad Mohol | असा ठरला शरद मोहोळच्या हत्येचा कट, वाचा नेमकं काय घडलं?
दरम्यान आता आरक्षणाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. प्रशासकीय पातळीवर देखील कुणबी नोंदणी तपासण्याचे काम वेगाने सुरू आहे. यामध्येच आता सरकारकडून राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) आज कुणबी प्रमाणपत्रासाठी सगे-सोयऱ्यांच्या संदर्भातील अधिसूचना निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Makar Sankranti 2024 । पतंगचा माेह जीवावर बेतला! घराच्या छतावरून पडून एकजण जागीच ठार
माहितीनुसार, आज दुपारपर्यंत नव्या अध्यादेशाचा ड्राफ्ट मनोज जरांगे यांना पाठवण्यात येणार आहे. त्यातील दुरुस्त्या पूर्ण झाल्यानंतर तो आज किंवा उद्या अध्यादेश निघेल अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे.
Deepti Sharma । ICC कडून मोठी घोषणा! टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूला दिला पुरस्कार