Maratha Reservation । सध्या एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाचे मागासलेपण सिद्धतेसाठी केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगाच्या अध्यक्षकांकडून स्वीकारला असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर हा अहवाल नियमानुसार मंत्री मंडळाच्या बैठकीत मांडला जाईल आणि त्यावर चर्चा होईल.
त्याचबरोबर येत्या 20 तारखेला विशेष अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनामध्ये देखील यावर चर्चा केली जाणार आहे. तसेच सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घ्यावे असे आव्हान देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले आहे.
Uddhav Thackeray । निवडणुकांच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का!
पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मागासवर्गाचे आभार मानले. एवढ्या कमी वेळामध्ये सर्वेक्षण पूर्ण केलं. युद्धपातळीवर दिवस रात्र काम या आयोगाने केलं. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर यावेळी जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना मराठा आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. असे देखील एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. नवीन मराठा आरक्षण हे कोणत्याही नोंदी नसणाऱ्यांना मिळणार आहे. असे देखील त्यांनी सांगितलं.
Eknath Shinde । मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद