Maratha Reservation । मराठा आरक्षणासंदर्भात समोर आली सर्वात मोठी अपडेट!

Manoj Jarange Patil

Maratha Reservation । सध्या राज्यभर मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालन्याचे मनोज जरांगे पाटील हे मैदानात उतरले आहेत. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नसल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी २० तारखेला मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर तीन कोटी मराठे मुंबईत धडक देतील असे देखील सांगितले जात आहे. त्या दृष्टीने आता सरकारने देखील हालचाली सुरू केल्या आहेत.

Accidents Prone Time In India । भारतात सर्वाधिक अपघात कधी होतात? जाणून घ्या महत्वाची माहिती

मनोज जरांगे यांचे आंदोलन होण्यापूर्वीच मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो अशा चर्चा सुरू आहेत. माहितीनुसार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये महसूल विभागाची एक बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये महसूल कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Viral Video । काळजाचा ठोका चुकवणारा क्षण! चिमुकला दिसताच कुत्र्याने घातली झडप; वाचवण्यासाठी आईची धडपड; पाहा व्हिडीओ

येत्या सात दिवसांमध्ये मराठा समाजाचे सर्व्हेक्षण पूर्ण करायचे आहे. महसूल कर्मचाऱ्यांना सर्व्हेक्षण पूर्ण करायचं आहे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा समाजाची घराघरात जाऊन माहिती गोळा केली जाणार आहे. पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये महसूल कर्मचाऱ्यांचे सर्व्हेक्षण होणार आहे.

Royal Enfield । ‘या’ मंदिरात देवाची नाही तर चक्क बुलेट बाईकची केली जाते पूजा; इतिहास वाचून व्हाल धक्क

Spread the love