Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजा चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी या गावांमध्ये मराठा आंदोलनकरते मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस असून त्यांची तब्येत खालावल्याची देखील माहिती समोर आली आहे. मात्र तब्येत खालवून देखील ते त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. काहीही झालं तरी मराठा आरक्षण मिळालाच पाहिजे असं त्यांचा अशी त्यांची मागणी आहे. सरकार जोपर्यंत मागणी मान्य करत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटले आहे
Ajit Pawar । अजितदादांवर पुतण्याचा पहिल्यांदाच निशाणा, म्हणाला; “त्या चौकशीचं काय झालं?…”
मनोज रंगे यांची सकाळपासून तब्येत खालावल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना तपासून सलाईन लावल आहे त्यांना ताकद नसल्याने बोलता देखील नीट येत नाही. जरांगे यांची तब्येत बिघडल्याचे माहिती मिळताच वैद्यकीय अधिकाऱ्यांच पथक उपोषणास्थळी हजर झाल आहे. उपचारानंतर उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीची संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
Agriculture News । मिळवायचा असेल लाखोंचा नफा तर आजच करा बांबूची शेती, सरकारही करेल मदत
सरकारने माझा जीवच घ्यायचा ठरवले आहे . दोन वर्षे मी सरकारसोबत तहच करतोय तरी देखील त्यांनी आमच्या पदरात अजून काहीच टाकलं नाही या सरकारच्या मनात नेमकं काय चाललंय असं ते म्हणाले आहेत. त्याचबरोबर मनोज जरांगे यांनी सरकारला मराठ्याचा कुणबीत समावेश करण्यासंदर्भात जीआर ककाढण्यासाठी चार दिवसांचा अल्टिमेट देखील जाहीर केला आहे.
Sharad Pawar । “शरद पवार खुनी आहेत”; टीका करताना शिवसेनेच्या बड्या नेत्याची घसरली जीभ