Maratha Reservation । बिग ब्रेकिंग! जरांगेंच्या मुंबईतील सभेबाबत उच्च न्यायालयाने स्पष्टच सांगितलं

Manoj Jarange Patil

Maratha Reservation । मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर 20 जानेवारी रोजी आंदोलन होणार आहे. मराठा समाजाच्या या आंदोलनाला परवानगी देऊ नये अशी मागणी करत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्यांना सुनावले. त्याचबरोबर न्यायालयाने याचिका दाखल करून घेण्यास देखील नकार दिला आहे.

Boy Gang Rape । धक्कादायक बातमी! विवाहित तरुणाला शेतात नेऊन सामूहिक बलात्कार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये त्यांनी म्हटले होते की, “20 जानेवारीला आझाद मैदान यामध्ये होणाऱ्या आंदोलनात प्रचंड संख्येने मराठा बांधव सहभागी होणार आहेत. यामुळे समाजात जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे या आंदोलनाला परवानगी देऊ नये अशी मागणी हेमंत पाटील यांनी केली होती. त्याचबरोबर जरांगे यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी देखील याचिकेद्वारे हेमंत पाटील यांनी केली होती.

Supriya Sule । प्रकाश आंबेडकरांशी युती करण्याबाबत सुप्रिया सुळे यांनी केले सर्वात मोठे वक्तव्य

याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली. त्यावर न्यायमूर्तींनी याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. त्याचबरोबर त्यांनी याचिकाकर्त्यांना चांगलेच सुनावले आहे.

Beed Accident News । कंटेनर- पिकअपचा भीषण अपघात; ५ जणांचा जागीच मृत्यू

Spread the love