Maratha Reservation । मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे अंतरवाली सराटी या ठिकाणावरून काल मुंबईसाठी रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत अनेक मराठा बांधव देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधून मनोज जरांगे पाटील वेगळीवेगळी वक्तव्य करत आहेत. सध्या देखील मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
Rashmika Mandanna । डिपफेक व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या अटक होताच रश्मिकाने दिली प्रतिक्रिया
माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, जर आमच्या मुलांच्या नरडीचा घोट घ्यायला निघाले तर तुमचे राजकीय अस्तित्व संपवायला आम्हाला वेळ लागणार नाही. 55 लाख नोंदी मिळाल्या आहेत. सुप्रीम कोर्टामधील आरक्षण आम्ही काही नाकारलं नाही. मात्र ते टिकलं नाही. क्युरेटिव्ह पीटिशन ही चेंबरमध्ये होते. ओपन कोर्टात होत नाही तसं झालं तर आरक्षण टिकणार नाही. असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
Amruta Fadnavis । अमृता फडणवीसांनी महिलांना दिला मोठा सल्ला; म्हणाल्या, “मी सकाळी लवकर उठून…”
मातोरी गावामध्ये मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं. मातोरी गावातून महाराष्ट्राच्या मराठा समाजाला विनंती आहे. सरकारला विनंती करणं आता बंद केले. जितक्या वेळेस करायचे तितक्या वेळेस विनंत्या करून झाल्या. त्यामुळे आपले आंदोलन हे होणारच. मात्र आपल्या आंदोलनाला डाग नाही लागला पाहिजे. मराठा जातीला डाग न लागू देण्याची जबाबदारी तुमची आहे. असे देखील ते म्हणाले आहेत.
5 ते 10 फूट अंतर ठेवून चला. दुसऱ्या गाडीला पास होण्यासाठी जागा द्या. आपल्या सर्वांना स्वयंसेवक म्हणून काम करायच आहे. मराठ्यांच्या आणि आरक्षणाच्या विरोधात बोलण्याची कोणाची हिंमत राहिली नाही. असे जरांगे पाटील म्हणाले आहेत.