Site icon e लोकहित | Marathi News

Maratha Reservation । मोठी बातमी! भाजप खासदाराच्या ताफ्यातील दोन गाड्या मराठा आंदोलकांनी फोडल्या

Maratha Reservation

Maratha Reservation । आरक्षणाच्या मागणीवरून मराठा समाज आता चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक गावांमध्ये पुढाऱ्यांना मराठा संघटनांकडून गाव बंदी करण्यात आली आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावात पाय ठेवू देणार नाही अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे. आता याचे पडसाद राजकीय वर्तुळात देखील उमटत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. (Latest Marathi News)

Bjp । भाजपला धक्का! मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बड्या नेत्यांनी निवडणूक न लढवण्याचा दिला इशारा

सध्या नांदेडचे भाजपा खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) यांना मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. प्रताप पाटील चिखलीकर हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोहर तेलंग यांच्या भेटीसाठी गुरुवारी रात्री कंधार तालुक्यातील अंबुलगा या गावात आले होते. यावेळी चिखलीकर गावात आल्याचे दिसताच त्या ठिकाणचे गावकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

Maratha Reservation । ‘या’ कारणामुळे गुणरत्न सदावर्तेंच्या गाड्या फोडल्या’ मंगेश साबळे यांनी सांगितले मोठे कारण

आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आमच्या गावात पाय ठेवू देणार नाही असं म्हणत संतप्त मराठा आंदोलकांनी चिखलीकर यांना घेरलं त्याचबरोबर यावेळी एक मराठा लाख मराठा अशा अशी घोषणाबाजी देखील मराठा आंदोलकांनी केली आणि त्यांच्या ताफ्यातील दोन गाड्या आंदोलकांनी फोडल्याची माहिती समोर आली आहे.

Eknath Shinde । एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का! मराठा आरक्षणासाठी शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुखाने दिला राजीनामा

यामुळे या ठिकाणी काही काळ तणावात वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, अंबुलगा गावामध्ये मराठा समाज आक्रमक झाल्याचे लक्षात येतात चिखलीकर यांनी त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला.

Spread the love
Exit mobile version