Maratha Reservation । “माझा जीव गेल्यावर…”, मनोज जरांगे यांचा सरकारला गंभीर इशारा

Manoj Jarange Patil

Maratha Reservation । सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच पेटलेला पाहायला मिळत आहेत. जालन्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाचा आरक्षण प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा नाहीतर मराठा समाज राज्यात आपली एकही सभा होऊ देणार नाही असा गंभीर इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

Sanjay Shirsath । ब्रेकिंग! संजय राऊतही सोडणार ठाकरेंची साथ? बड्या नेत्याचा दावा

सध्या मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसले असून त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्ही मराठा समाजाची फसवणूक करता. अध्यादेश व सगे-सोयरे बाबत अजूनही कोणताच निर्णय झालेला नाही. अधिवेशन देखील तातडीने बोलावले गेले नाही. कायदा पास होत नाही. माझा जीव गेल्यावर सरकार राहील का? असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे.

Ashok Chavan । भाजपच्या मंचावर अशोक चव्हाणांची जीभ घसरली; म्हणाले, “मुंबई काँग्रेस…”

आंतरवली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले असून त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर गंभीर टीका केली आहे. त्याचबरोबर यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवार यांच्यावर देखील टीका केली आहे. अजित पवार फक्त भुजबळांना वेळ देतात अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.

Mallika Rajput Death । ब्रेकिंग! मनोरंजन विश्वात मोठी खळबळ! प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू

Spread the love