Maratha Reservation । ब्रेकिंग! मराठा आरक्षणावर मोठा निर्णय होणार; उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

Eknath Shinde Ajit Pawar

Maratha Reservation । मागच्या अनेक महिन्यापासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला चर्चेत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याचे राजकीय वातावरण देखील तापल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. दरम्यान आज मराठा आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. कारण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावर निवेदन मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Accident News । कारचा भीषण अपघात! मुलीच्या डोळ्यादेखत आई आणि भावाचा गेला जीव

महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवेदनापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत. (Ajit Pawar meets Eknath Shinde) त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे . उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री यांच्या रामगिरी निवासस्थानी दाखल झाले आहेत.

Viral Video । महाराष्ट्रात एका व्यक्तीने कोरियन महिलेसोबत केले घाणेरडे काम, जीव वाचवण्यासाठी महिला पळू लागली, धक्कादायक व्हिडिओ आला समोर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी फक्त अजित पवारच नाही तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दाखल झाले आहेत. त्यामुळे या तीन बड्या नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मराठा आरक्षणावर खरंच तोडगा निघणार का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

maharashtra school time change । पालकांसाठी सर्वात मोठी बातमी! मुलांच्या शाळांची वेळ बदलली, जाणून घ्या किती वाजता भरणार शाळा?

Spread the love