Manoj Jarange । मराठा समाज सरकारला पायाखाली तुडवू शकतो, मनोज जरांगेंचा इशारा

Manoj Jarange

Manoj Jarange । बीड : मराठा समाज आरक्षणासाठी (Maratha Reservation) आक्रमक झाला आहे. याच मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आमनेसामने आले आहेत, यामुळे राज्याचे राजकारण तापले आहे. अशातच आता आयोजित मराठा समाजाच्या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ आणि सरकारला (Govt) इशारा दिला आहे. यावर आता भुजबळ कोणती प्रतिक्रिया देतात? हे पाहणं महत्त्वाचं आहे. (Latest Marathi News)

Accident News । भीषण अपघात! ट्रॅक्टर पलटी झाल्याने 9 मजुर गंभीर जखमी

“भुजबळ यांचे ऐकून मराठ्यांना आरक्षण दिले जाणार नसेल, तर गाठ मराठा समाजासोबत आहे. मराठा समाजाला एकदा आरक्षण मिळू द्या, मग मी त्याच्याकडे बघतो, खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांचा हिशोब केला जाईल. गोळीबार, लाठीमार होऊन आंदोलकांनी माघार घेतली नाही. गंभीर गुन्हे आपल्यावर दाखल केले असून पहिल्यांदा इतकं निर्दयी आणि निष्ठुर सरकार पाहिलं, असल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला आहे.

Rajinikanth Birthday । बस कंडक्टर ते तामिळनाडूचा थलायवा, रजनीकांतच्या संपत्तीचा आकडा पाहून तुमचेही फिरतील डोळे

पुढे जरांगे पाटील म्हणाले की, ” मराठा आरक्षणाचे पुरावे असताना आरक्षण दिले नाही. मराठा समाजाने इतरांसाठी छातीचा कोट केला असून आता तेच लोक आरक्षणाला विरोध करत आहेत. आत्तापर्यंत 39 लाख मराठ्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला आहे. सरकारला मराठा समाज सोडणार नाही. सरकारला पायाखाली तुडवू शकतो. भुजबळांनाही पाहून घेऊ, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

Nagpur News । धक्कादायक! मुलीने मोबाईलचा जास्त वापर केला, वडिलांनी थांबवल्याने अल्पवयीन मुलीने केली आत्महत्या

Spread the love