TDM व तेंडल्या यांसारख्या चित्रपटांच्या निमित्ताने पुन्हा एकदा मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळत नसल्याच्या मुद्द्याने डोके वर काढले आहे. मराठीत अतिशय दर्जेदार चित्रपट ( Marathi Movies) असून देखील त्यांना स्क्रीन मिळत नसल्याची तक्रार सतत केली जाते. TDM च्या निमित्ताने सध्या अनेक लेखक, दिग्दर्शक, निर्माते याबद्दल विविध ठिकाणी आपले मत मांडत आहेत. मात्र खूप वर्षांपूर्वी मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे (Lakshmiknat Berde) यांनी मराठी सिनेमा का चालत नाही ? याबद्दलचे कारण सांगितले आहे.
दुरदर्शन मधील एका मुलाखतीमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी सिनेमा का चालत नाही. याबाबत आपले स्पष्ट विचार मांडले होते. मराठी चित्रपट चालावा असे तुम्हाला मनापासून वाटत असेल तर तुम्ही थिएटर मध्ये या आणि चित्रपट पहा. मराठी सिनेमा चालणं हे पूर्णतः तुमच्या हातात आहे. जेव्हा साऊथचा एखादा सिनेमा प्रदर्शित होतो, तेव्हा तिथले प्रेक्षक त्या सिनेमाला प्रतिसाद देतात. त्यामुळे त्या सिनेमांना प्रोत्साहन मिळते.
Prithvi shaw ने हाफ सेंच्युरी ठोकल्यावर नाशिकच्या मुलीने केले गजब सेलिब्रेशन, तिने पृथ्वीसाठी खास….
जर तुम्ही प्रतिसाद दिला तर मराठी चित्रपटांना प्रोत्साहन मिळेल. जोपर्यंत तुम्ही थिएटर मध्ये जाऊन सिनेमा पाहणार नाही. तोपर्यंत सिनेमा चालणार नाही. असे मत लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्याकाळी मांडले होते. त्यांची दुरदृष्टी सध्याच्या काळात तंतोतंत लागू होत आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील सुवर्णकाळ गाजवला आहे. अशी ही बनवाबनवी, धडाकेबाज, दे दणादण यांसारख्या भन्नाट चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत.
Lumpy । शेतकऱ्यांनो सावधान! आटोक्यात आलेला लंम्पी पुन्हा वाढतोय