
Ayodhya Ram Mandir । अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येतील मंदिरात काल रामलल्ला (Ramlalla) विराजमान करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा केली असून काल दिवसभर देशात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. प्रतिष्ठापणेनंतर आज रामभक्तांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली. (Latest marathi news)
यावेळी मंदिराच्या आवारात चेंगराचेंगरी झाल्याचं पाहायला मिळाले. लोकांनी दर्शनासाठी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलीस आयुक्त, महानिरीक्षक, अतिरिक्त पोलीस महासंचालक घटनास्थळी तातडीने दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी लाऊडस्पीकर हातात घेत भाविकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
NCP MLA Disqualification | आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट
पाचशे मीटर अंतरावर तीन विभागात बॅरिकेड्स लावून भाविकांना रोखण्याचा प्रयत्न केला. जमावाच्या दबावाने हे गेट तोडले. त्यामुळे भाविक आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले. भाविकांनी बॅरिकेडिंग ओलांडून आत प्रवेश करताच सकाळी 11.30 वाजता आरतीसाठी मंदिरातील दर्शन काही काळ थांबवले. गर्दी असल्याने राहिल्याने पुन्हा दर्शन सुरू केले. पण पुन्हा 2 वाजण्याच्या सुमारास आतील आणि बाहेरील भाविकांची प्रचंड गर्दी नियंत्रणाबाहेर जाऊ लागली. त्यामुळे भाविकांवर पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला.
Pune Accident News । पुण्यात ट्रकचा अतिशय भीषण अपघात, २ जण गंभीर जखमी