समाजात स्त्री-पुरुष समानतेचे मूल्य रुजवण्यासाठी समाजसुधारकांनी आतापर्यंत भरपूर प्रयत्न केले आहेत. परंतु, तरी देखील आजही स्त्री-भ्रूण हत्या मोठ्या प्रमाणात होत आहे. ‘घराचा वंश चालवण्यासाठी मुलगाच हवा.’ या विचारातून समाज अजूनही बाहेर पडला नाही यामुळे मोठ्या प्रमाणात गर्भलिंग चाचणी केली जाते. गर्भलिंग निदान कायद्याने ( PCPNDT act) गुन्हा असूनही अशा घटना घडत असल्याने मुलींच्या संख्येत घट होत आहे. यामुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत.
आनंदाची बातमी! विहरीसाठी शेतकऱ्यांना मिळणार लाखोंचे अनुदान
मुलांना लग्नासाठी मुलगी न मिळणे ( Girl for marriage) हा सध्याचा मोठा सामाजिक प्रश्न ठरत आहे. गर्भलिंग निदान होत असल्याने मुलींच्या संख्येत घट होत आहे. परिणामतः मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. यासाठी गर्भलिंग निदान कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. या मागणीसाठी सोलापूरात अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले आहे.
राज्यामध्ये कोरोना निर्बंधाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा, म्हणाले…
सोलापूर येथील क्रांती संघटनेने हे आंदोलन केले असून यावेळी तरुणांनी नवरदेवाचा पेहराव करत डोक्याला बाशिंग बांधून आंदोलनात सहभाग घेतला. तसेच या तरुणांनी सलावर परिधान केला होता. नवरदेवाची वेशभूषा करत घोड्यावर स्वार होत, या तरुणांनी PCPNDT कायद्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी व्हावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली.