
जेजुरी : यावर्षी झेंडूची (marigold) लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. मात्र लागवड जास्त झाली असली तरी अतिवृष्टी पावसामुळे झंडुचे मोठ्या नुकसान झाल्याने पुरवठय़ावर परिणाम होऊन सणासुदीच्या मुहूर्तावर झेंडूच्या फुलांचे भाव वाढण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने लॉन्च केले ‘जलदूत ऍप’, आता शेतकऱ्यांना मिळणार विहीरींच्या पाणी पातळीची माहिती
दसऱ्याच्या दिवशी झेंडूला मोठ्या प्रमाणात मागणी असते. पण सततच्या पावसामुळे काही ठरावीक भागांमधेच फुलांची वाढ चांगली झाली आहे. त्यामुळे अधिक आणि पुरवठा कमी अशी स्थिती निर्माण होऊन दसऱ्याला झेंडूच्या फुलांचे भाव वाढतील, असा व्यापाऱ्यांनी अंदाज व्यक्त केला आहे. पुणे जिल्ह्यातील जेजुरीचा झेंडू बाजार राज्यात प्रसिद्ध आहे. पण नुकसानीमुळे याही बाजारात झेंडूची आवक कमी होण्याची शक्यता आहे. झेंडूच्या शेतीतुन शेतकऱ्यांना देखील बऱ्यापैकी नफा मिळतो परंतु यावर्षी पावसाने फुलांच्या शेतीचे नुकसान केल्याने शेतकऱ्यांच्या डोळय़ांत पाणी आले आहे.
Rahul Gandhi: राहुल गांधींनी शरद पवार स्टाईलने मुसळधार पावसात दिल भाषण, व्हिडीओ व्हायरल
१०० रु किलोचा भाव मिळण्याची शक्यता –
बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे त्यामुळे फुलांची नासाडी झाली आहे. फुलांच्या मागणीत वाढ होऊन जेजुरीच्या पारंपरिक बाजारामध्ये झेंडू मोठा भाव खाण्याची शक्यता आहे. ठोक बाजारात एक किलोचा भाव किमान १०० रुपयांच्या आसपास राहील, अशी शक्यता व्यक्त व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.