Mark Zuckerberg Injury । सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकचे संस्थापक, मार्क झुकरबर्ग रुग्णालयात दाखल आहेत. मार्कने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून चाहत्यांना ही माहिती दिली. मार्क झुकरबर्ग यांनी हॉस्पिटलमधला त्यांचा फोटो शेअर केला आहे. त्यांना रुग्णालयात का दाखल करण्यात आले, याचीही माहिती देण्यात आली आहे. रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टरांचे आभार मानत त्यांनी लोकांना सांगितले की, त्यांची शस्त्रक्रिया झाली आहे. ते आता बरे असून लवकरच डिस्चार्ज मिळणार आहे.
ST Bus । दिवाळीपूर्वीच महागला लालपरीचा प्रवास, एसटी महामंडळाकडून तिकीट दरात मोठी वाढ
रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले
मार्शल आर्टचा सराव करताना मार्क झुकरबर्ग यांच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, त्यानंतर मार्क झुकरबर्ग यांनी इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट करून सांगितले की, मार्शल आर्टचा सराव करताना गुडघ्याला दुखापत झाली. या दुखापतीमध्ये त्यांच्या एसीएलला इजा झाली आहे. याचीच आता शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांची काळजी घेतल्याबद्दल त्यांनी डॉक्टर आणि टीमचे आभार मानले आहेत.
Eknath Shinde । शिंदे सरकारचा मोठा निर्णय! मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार ‘या’ सवलती
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये मार्क झुकरबर्ग हे हॉस्पिटलमध्ये बेडवर झोपलेले दिसत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या डाव्या पायाला पट्टी बांधलेली आहे आणि पायाला आधार देणारा ब्रेस दिसत आहे.
Urfi Javed । उर्फी जावेदला अटक? पोलिसांनी केली मोठी कारवाई; नेमकं प्रकरण काय?