आज समाज कितीही सुशिक्षित झाला असला तरीही समाजातून गुन्हेगारी प्रवृत्ती कमी झालेली नाही. रोज आजूबाजूला विविध गुन्हे झालेले आपण पाहत असतो. दरम्यान पुणे येथे काही दिवसांपूर्वी तरुण मुलाच्या खुनाची ( Murder) घटना घडली होती. यातील फरार आरोपीला पोलिसांनी नुकतेच अटकेत घेतले आहे. पुणे येथून फरार झालेला हा आरोपी श्रीगोंदा ( Shrigonda) येथे सापडला आहे.
बारामती मधील डॉक्टरांवर गंभीर आरोप; हलगर्जीपणा केल्याने बाळाचा मृत्यु झाल्याने कारवाईची मागणी
पुणे येथील चंदननगर परिसरात असणाऱ्या मोकळ्या जागेवरून 5 तरुणांनी ओमकार भंडारी ( रा. केसकंद) या तरुणावर धारधार हत्याराने वार केला होता. यामध्ये ओमकार भंडारी याचा मृत्यु झाला. दरम्यान पोलिसांनी या हत्येप्रकरणी इर्शाद बागमार, सुफियान तांबोळी, हुसेन शेख, अनिकेत शिंदे यांना अटक केली होती. मात्र यांच्या सोबतीला असणाऱ्या शाहरुख शेख मात्र पोलिसांनी तपास सुरू करताच पुण्यातून फरार झाला होता.
आजच ही दोन कामे करून टाका! अन्यथा पीएम किसान योजनेचा 13 व्या हप्ता मिळणार नाही
दरम्यान पोलिसांनी तपास मोहीम सुरूच ठेवली होती. तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत पोलीस अंमलदार नामदेव गडदरे व सुभाष आव्हाड यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत मिळून शाहरुख चांद शेख याला श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव येथून ताब्यात घेतले आहे. तरुण युवकांनी एकत्र येऊन तरुण युवकाची केलेली हत्या यामुळे पुणे येथील चंदननगर परिसरात खळबळ माजली होती.
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तुरुंगात जाणार? नारायण राणे यांचा गंभीर इशारा