Lok Sabha Election । राज्यात काही दिवसांवर लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha Election 2024) येऊन ठेपल्या आहेत. सर्व पक्षांमध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यावरून बैठका सुरु आहेत. तर काहीजण तिकीट न मिळाल्याने दुसऱ्या पक्षात जाणे पसंत करत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला (Congress) आणखी मोठा धक्का बसला आहे.
Vasant More । सर्वात मोठी बातमी! वसंत मोरे करणार भाजपमध्ये प्रवेश? ‘त्या’ फोनवरून रंगली चर्चा
अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचे समर्थक मारोतराव कवळे गुरुजी (Marotarao Kavale) यांनी आज भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. दरम्यान, कवळे गुरुजी यांचे नायगाव विधानसभा मतदारसंघात काम आणि दांडगा जनसंपर्क असून ते साखर आणि गूळ कारखानदारी, पतसंस्था, दूध संघ इत्यादी माध्यमातून सहकार क्षेत्रात सक्रिय आहेत.
Cabinet meeting । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! सरकारने अहमदनगर शहराचं नाव बदललं, हे असणार नवीन नाव
तसेच त्यांनी काही काळ त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकारणाचा अनुभव घेतला. त्यानंतर ते नायगाव विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर लढले होते. मारोतराव कवळे यांच्या भाजप प्रवेशाचा फटका काँग्रेसला बसेल. निवडणुकीच्या तोंडावर हा प्रवेश केल्याने महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार वसंत चव्हाण यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.