Site icon e लोकहित | Marathi News

Marriage | इथं एकीचेच असतात वांदे! पण ‘हा’ गडी संभाळतो ९ बायका

Marriage There are only one dish here! But 'this' gadi takes care of 9 wives

सध्या काळ असा आहे की लोकांना आपली एक बायको सांभाळताना देखील दमछाक होते. मात्र अशातच एका व्यक्तीने चक्क ९ बायका केल्या. एकाच वेळी ९ जणींशी लग्न करून त्याने नवीन विक्रम केला आहे. आपल्या बायकांना पटवण्यासाठी त्याने खास बॉडी देखील बनवली आहे.

IPL 2023 Winner | आयपीएलचा अंतिम सामना पार पडला! चेन्नई सुपर किंग्जकडे पाचव्यांदा विजेतेपद…

आर्थर ओ उर्सो असे या ९ बायका असणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. ही व्यक्ती एक ब्राझिलियन मॉडेल असून आपल्या बायकांना सांभाळण्यासाठी तो जीममध्ये घाम गाळतो. आर्थरने जबरदस्त शरीरयष्टी बनवली आहे. आर्थरचे इन्स्टाग्रामवर फोटो पाहिल तर लोक थक्क होतात. इतका तो निरोगी आणि फिट आहे!

Maharashtra Sadan | महाराष्ट्र सदनातील ‘त्या’ घटनेवरून राजकीय वातावरण तापले; मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे चौकशीची केली मागणी

न्यूयॉर्क पोस्टच्या अहवालानुसार अॅब्ज आणि डोले-शोले बनवण्यासाठी आर्थरने खूप मेहनत घेतली आहे. तो त्याच्या रोजच्या वर्कआउटची खूप काळजी घेतो. तसेच रोज ६ तास व्यायाम देखील करतो. त्याची सुरुवात स्ट्रेचिंगपासून होते, त्यानंतर कार्डिओ आणि हेवी वेट ट्रेनिंग होतं.

मोठी बातमी! चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

आर्थर नियमित स्विमिंग करतो. यामुळे त्याचे वजन कमी होण्यास आणि स्टॅमिना वाढण्यास मदत होते. तसेच वर्कआउटनंतर तो लगेच प्रोटीन घेतो. यामुळे त्याच्या शरीरातील थकवा दूर होतो. स्नायूंचा त्रासही कमी होतो. आर्थरला आहारात अंडी आवडतात.

Romantic Viral video | अन् त्यांनी बुलेट वरच सुरू केला रोमान्स! व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घडवली अद्दल

एवढी मेहनत करून सुद्धा आर्थरला ९ पैकी ३ पत्नींनी घटस्फोट दिला आहे. त्यानंतर त्याने आपल्या ६ बायकांसोबत झोपण्यासाठी ८० लाखांचा बेड खरेदी केला होता. तो बेड तयार करण्यासाठी १५ महिने लागले. यावर १२ जणांची टीम सतत काम करत होती. आपल्या बायका नाराज झालेल्या त्याला आवडत नाही. म्हणून तो सतत काहीतरी नवीन करत राहतो.

दिल्लीत धक्कादायक घटना! अल्पवयीन मुलीवर आधी चाकूने वार, नंतर दगडाने ठेचले अन्… घटना वाचून बसेल धक्का

Spread the love
Exit mobile version