
सध्या एक आगळीवेगळीच घटना समोर येत आहे. मुंबई येथील दोन जुळ्या आयटी इंजिनियर मुलींनी एकाच मांडवामध्ये एका तरुणासोबत अनोखा विवाह केल्याची घटना माळशिरस (Malshiras) तालुक्यातील अकलूज या ठिकाणी घडली आहे.
“मी प्रत्येक गोष्टींवर…”, मानसी नाईकच्या पतीची इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कांदिवली इथं आय टी इंजिनियरिंग (IT Engineering) करून चांगल्या पगाराची नोकरी असणाऱ्या पिंकी मिलिंद पाडगावकर आणि रिंकी मिलिंद पाडगावकर या दोन जुळ्या बहिणींनी एकाच मुलासोबत लग्नगाठ बांधली आहे. मात्र या लग्नानंतर एक महत्वाची माहिती समोर आली आहे. या लग्नानंतर अतुलविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. जुळ्या बहिणींचा विवाह झाल्याने वराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतुलविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम ४९४ अन्वये पोलीस ठाण्यात एनसीआरची नोंद करण्यात आली आहे.
रस्त्यावरील धुळीमुळे भीषण अपघात! एकजण जागीच ठार तर पाच गंभीर जखमी
दरम्यान, पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणी लहानपणापासून दिसायला एकसारख्या आहेत. त्या जेवण देखील एकाच ताटात करतात. त्यांना कायम एकत्र राहायचे होते त्यामुळे त्यांनी एकाच तरुणाशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. पिंकी आणि रिंकी यांना एकत्र राहण्यासाठी एकच नवरा हवा होता. अखेर कुटुंबीयांनी त्यांच्या या विवाहसोहळ्याला मान्यता दिली आणि २ डिसेंबरला हा विवाहसोहळा पार पडला.
श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव परिसरात धुळीमुळे भीषण अपघात! एकजण जागीच ठार तर पाच गंभीर जखमी