Maruti Suzuki Upcoming Car | मारुती सुझुकी, भारतीय वाहन उद्योगातील एक प्रमुख नाव, लवकरच आपल्या ग्राहकांसाठी एक नविन गाडी घेऊन येत आहे. कंपनीने जाहीर केले की, सप्टेंबरच्या 15 तारखेला त्यांनी त्यांच्या लोकप्रिय सेडान कार, डिझायरचे नवीन फेसलिफ्ट वर्जन लॉन्च करणार आहेत. हे नवीन मॉडेल ग्राहकांना अनेक आधुनिक फीचर्स आणि अपडेटेड डिझाइनसह सादर करण्यात येणार आहे.(Maruti Suzuki Upcoming Car)
Badlapur case । बदलापूर अत्याचार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर!
नवीन डिझायर फेसलिफ्टमध्ये प्रमुख बदल करण्यात आले आहेत. बाहेरून पाहता, गाडीच्या समोरच्या भागात नवीन बोनेट, अपडेटेड बंपर आणि अधिक आधुनिक हेडलाइट्स मिळणार आहेत. साइड प्रोफाइल आणि मागील लूकमध्येही बदल होणार असून, नवीन बंपर आणि LED टेललाइट्स हे देखील समाविष्ट असतील.
Ajit Pawar । निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना मोठा धक्का; बडा नेता घेणार तुतारी हातात
फेसलिफ्ट डिझायरमध्ये (Facelift Desire) १.०-लीटर Z-Series तीन सिलिंडर इंजिन असणार आहे, जे ८२ हॉर्सपॉवर आणि ११२ Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. विशेष म्हणजे, नवीन डिझायर CNG वेरिएंटसह उपलब्ध होईल, ज्याचा मायलेज ३० किमी/किलोपर्यंत होईल, अशी अपेक्षा आहे. हे इंजिन पाच-स्पीड मॅन्युअल आणि पाच-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह जोडलेले असेल, ज्यामुळे ड्रायव्हिंगचा अनुभव अधिक आरामदायक होईल.
LPG Gas Cylinder Price । गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ; सर्वसामान्यांसाठी महागाईची चिंता
आतल्या भागातही मोठे अपडेट्स अपेक्षित आहेत. नवीन डिझायरमध्ये ६ एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), फ्रंट-व्हील ड्राइव्ह, आणि ४ पॉवर विंडोज सारखी सुविधा मिळणार आहे. या कारमध्ये ॲडव्हान्स ड्रायव्हिंग असिस्टंट सिस्टम (ADAS) देखील समाविष्ट असेल, जी सुरक्षिततेसाठी अतिरिक्त उपाय प्रदान करेल.
Ajit Pawar । बिच्चारे अजितदादा… 60 जागांवर आले, बड्या नेत्याची खरमरीत टीका
सध्याच्या डिझायरपेक्षा नवीन फेसलिफ्ट डिझायरची किंमत काहीशी जास्त असण्याची अपेक्षा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवीन डिझायरची एक्स-शोरूम किंमत सुमारे दहा लाख रुपये असू शकते, म्हणजेच सध्याच्या मॉडेलच्या किंमतीपेक्षा चार लाख रुपये जास्त.
Harshwardhan Patil । राजकारणातून सर्वात मोठी बातमी! हर्षवर्धन पाटलांनी जिल्हा अधिवेशनाला दांडी मारली
मारुती सुझुकीच्या या नवीन लॉन्चची प्रतीक्षा ग्राहकांसाठी आणि ऑटोमोटिव्ह जगतातील तज्ञांसाठी एक मोठा उत्साह निर्माण करणारी घटना ठरणार आहे. 15 सप्टेंबर रोजी या नवीन डिझायरचे अनावरण होईल का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.