स्वतःच्या हक्काची गाडी विकत घेणे हे प्रत्येक सामान्य माणसाचे स्वप्न असते. भारतातील बहुतांश लोक गाडी खरेदी करताना मारुती सुझुकी ला प्राधान्य देतात. यांच्या मारुती सुझुकी बलेनो (Maruti Suzuki Baleno) या मॉडेलला भारतीय बाजारपेठेत चांगली मागणी आहे. या कारच्या काही वैशिष्ट्यांमुळे ही कार लोकांच्या पसंतीस उतरत आहे. जाणून घेऊया या कारच्या फिचर्स बद्दल…
गौतमीने स्पष्टच सांगीतलं तिला कसा नवरा पाहीजे; म्हणाली, “पैसे बंगला…”
ही प्रीमियम हॅचबॅक कार बाजारात सिग्मा, डेल्टा, झेटा आणि अल्फा या चार ट्रिममध्ये उपलब्ध आहे. एवढेच नाही तर 6 मोनोटोन कलर्स मध्ये ही कार तुम्हाला निवडता येऊ शकते. यामध्ये नेक्सा ब्लू, पर्ल आर्क्टिक व्हाइट, ग्रॅंड्यूअर ग्रे, स्प्लिंडिड सिल्व्हर, ऑप्युलंट रेड, लक्स बेज आणि पर्ल मिडनाईट ब्लॅक यांसारख्या रंगांचा समावेश आहे.
पुणे लोकसभा पोटनिवडणूकीसाठी रवींद्र धंगेकर मैदानात उतरणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
इंजिन आणि मायलेजच्या बाबतीत देखील ही कार लोकांना फायदेशीर वाटते. या कारला 1.2 लीटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन मिळते. हे इंजिन 90PS/113Nm आउटपुट जनरेट करते. याला 5-स्पीड मॅन्युअल किंवा पाच-स्पीड AMT ट्रान्समिशनशी जोडले गेले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे इंजिन CNG मॉडेलमध्ये 77.49PS पॉवर आणि 98.5Nm टॉर्क जनरेट करते. यामध्ये 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्याय मिळतो.
धक्कादायक प्रकार! तरुणाच्या प्रायव्हेट पार्टमधून पोटात घुसला साप, पाहून डॉक्टरही हादरले…
या कारची किंमत 6.61 लाख ते 9. 88 लाख इतकी आहे. वायरलेस ऍपल कार प्ले,अँड्रॉइड ऑटोसह नऊ-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, अर्कामीस साउंड सिस्टीम, क्रूझ कंट्रोलसह हेड-अप डिस्प्ले, EBD सह ABS, हिल-होल्ड असिस्ट, ISOFIX अँकरेज, मागील पार्किंग सेन्सर्स आणि 360-डिग्री कॅमेरा ही या कारची विशेष वैशिष्ट्ये आहेत.