पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) तृणमूल काँग्रेसच्या (West Bengal) नेत्याने बिर्याणीच्या मसाल्याबाबत एक आगळावेगळाच दावा केला आहे. रविंद्रनाथ घोष (Rabindranath Ghosh) असं या नेत्याचे नाव आहे. रविंद्रनाथ हे ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील (Mamata Banerjee government) माजी मंत्री आहेत. रविंद्रनाथ घोष यांच्या दाव्यानुसार बिर्याणीच्या मसाल्यामुळे पुरूषामधील पौरुषत्व कमी होत आहे. या दाव्यानंतर रविंद्रनाथ घोष यांनी बंगालमधील बिर्याणीचे दुकाने (Biryani shop) बंद पाडण्यास भाग पाडले आहे.
मोठी बातमी! अंध मुलांच्या शाळेला आग लागून ११ विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू
नेमक काय म्हणाले रविंद्रनाथ घोष?
रविंद्रनाथ घोष म्हणाले की, “बिर्याणीतील मसाल्यामुळे अनेक लोकांच्या पौरूषत्वावर परिणाम झाला असून अनेक लोक याचे बळी पडले आहेत”. इतकंच नाही तर मागच्या काही दिवसांत याप्रकरणी अनेक तक्रारी आल्या आहेत. दरम्यान अनेक पुरूषांना या लैंगिक समस्या आल्या असून नेमक्या कोणत्या मसाल्याचा बिर्याणीमध्ये वापर केला आहे हे त्यांना अद्याप माहिती नाही असंही घोष म्हणाले.
WhatsApp: “…क्या गुंडा बनेगा रे तु?” व्हॉट्सअॅप डाऊन होताच ट्विटरवर मिम्सचा पडला पाऊस
दरम्यान, रविंद्रनाथ घोष यांनी उत्तरप्रदेश आणि बिहारमधील अनेकजण परवानगीविना बिर्याणी विकत असल्याचा देखील दावा केला आहे. तर काही जणांनी तक्रार केल्यानंतर ज्या दुकानांकडे परवानगी नाही त्या दुकानांचा आम्ही शोध घेऊन असे दुकाने बंद पाडले आहेत असंही घोष म्हणाले.
WhatsApp: व्हॉट्सअॅपची सेवा सुरु, नेमकी का बंद होती सेवा? वाचा सविस्तर