दोन आठवड्यांपूर्वी, “चीज सोडा ब्लास्ट” बनवणारी एक इंस्टाग्राम रील व्हायरल झाली होती. आता सध्या देखील एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये “मटका डोसा” दिसत आहे. हे पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत.
हा व्हिडिओ ट्विटरवरून (@ragiing_bull) या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करत “#matkadosa” असे कॅप्शन देखील देण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये डोसा नेमका कसा बनवला या सर्व गोष्टी दाखवल्या गेल्या आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ लोकांच्या पसंतीस उतरत आहे.
व्हॉट्सअॅपने आणले भन्नाट फीचर! आता फोटोमधून कॉपी करता येणार टेक्स्ट
हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी या व्हिडिओवर वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देखील येत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
#MatkaDosa. pic.twitter.com/Jg5K03uFzT
— Deepak Prabhu/दीपक प्रभु (@ragiing_bull) March 14, 2023