योग्य ज्ञान व कष्ट करण्याची तयारी असेल तर माणूस काहीही करू शकतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे धुळे जिल्ह्यातील अभिमत विद्यापीठातील दोन तरुणांनी मिळवलेले यश! एसव्हीकेएम संचलित एनएमआयएमएस ( NMIMS) च्या अभिमत विद्यापीठात बी.टेक च्या अंतिम वर्षातील संदीप वाघ व सागर बीडकर यांना ट्रायडेंट लिमिटेड कंपनीतर्फे घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यु मध्ये तब्बल 18 लाख रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे. ही कंपनी लुधियाना ( Ludhiyana) येथील आहे.
बजरंग दलाने रॅपर एमसी स्टॅनचा कार्यक्रम केला बंद; पाहा VIDEO
महत्त्वाची बाब म्हणजे एवढे मोठे पॅकेज मिळालेले दोन्ही तरुण शेतकरी कुटुंबातील सदस्य आहेत. कंपनीतर्फे घेण्यात आलेल्या समूहचर्चा व वैयक्तिक मुलाखत या दोन्ही प्रक्रिया पार करून या तरुणांची कंपनीने निवड केली आहे. सामान्य कुटुंबातील तरुणांनी मिळवलेल्या या नेत्रदीपक यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अमृता फडणवीसांच्या ‘त्या’ प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी केलं मोठं वक्तव्य; म्हणाले…
ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबात असणाऱ्या युवकांना संधी लाभावी यासाठीच शिरपूरमध्ये सप्ततारांकित शैक्षणिक संकुलाची उभारणी केली आहे. याठिकाणी जागतिक स्पर्धेला सामोरे जाणारे विद्यार्थी घडावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. असे वक्तव्य अभिमत विद्यापीठाचे ( Abhimat University) कुलपती अमरिशभाई पटेल यांनी यावेळी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधार कार्ड संबंधी घेतला मोठा निर्णय!