Site icon e लोकहित | Marathi News

बारामतीमधल्या शेतकऱ्याची कमाल! आल्याच्या शेतीतून कमावले लाखो रुपये…

Maximum of farmers in Baramati! Earned lakhs of rupees from ginger farming...

कष्ट आणि मेहनतीसोबत निसर्गाची साथ असेल तर शेतकरी काहीही करू शकतो! याची प्रचिती बारामती मधील एका शेतकऱ्याने मिळवलेले उत्पन्न पाहून येते. या शेतकऱ्याने फक्त पावणेदोन एकरांत १८ लाख पन्नास हजार रुपये एवढे मोठे उत्पन्न काढले आहे. या शेतकऱ्याचे नाव संभाजीराव काकडे असे असून ते बारामती मधील निंबुत येथील आहेत.

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! एका आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईची रक्कम जमा केली जाईल

संभाजीराव काकडे यांनी एक नवीन प्रयोग म्हणून आपल्या शेतात आल्याचे पीक घेतले. (Ginger Farming) त्यांनी पावणे दोन एकर क्षेत्रात आल्याची लागवड केली. यातून त्यांना एकूण २८ टन माल मिळाला आहे. विशेष बाब म्हणजे या मालाला चांगला दर देखील मिळाला. प्रतिटन ६६ हजार रुपयांनी त्यांना एकूण १८ लाख पन्नास हजार रुपये मिळाले.

“मी नवऱ्याला सोडेल, पण आयुष्यात ‘या’ व्यक्तीला कधीच सोडणार नाही”; गौतमीने केला मोठा खुलासा

आल्याची शेती करण्यासाठी संभाजीराव यांना आतापर्यंत ४ लाख रुपये खर्च आला होता. हा खर्च कमी करून संभाजीराव सध्या १४ लाख पन्नास हजार रुपयांनी फायद्यात आहेत. यामुळे त्यांच्या शेतीच्या प्रयोगाची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. याआधी देखील संभाजीराव यांनी आपल्या शेतात आल्याचे पीक घेतले होते. मात्र,त्यावेळी आल्याला चांगला दर मिळाला न्हवता. ( Experiment)

“…तर आयुष्यभर शेतीच करत राहिलो असतो” सैराट फेम लंगड्याने केला मोठा खुलासा!

दरम्यान, काकडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हंटले आहे की, सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्यायला हवा. हमीभाव दिल्यास शेतात काम करणाऱ्या मजुरांना देखील फायदा होईल. तसेच तरुणवर्ग शेतीकडे वळण्यास मदत होईल. ते सुद्धा शेतात नवनवीन प्रयोग करतील.

धक्कादायक! शेतात काम करताना शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू

Spread the love
Exit mobile version