सातारा : आपला भारत देश कृषीप्रधान देश (Agrarian countries) आहे. दरम्यान देशातील प्रत्येक शेतकरी (farmers) आपल्या शेतीमध्ये आपल्या कल्पनेने नवनवीन पिके (crops) घेऊन मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत असतात. दरम्यान अशातच सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गटशेतीतून (group farming) बटाट्याचे उत्पादन घेतले आहे. तब्बल 29 एकरामध्ये लाल व काळ्या मातीत 10 हजार क्विंटल बटाट्याचे उत्पादन (Potato production) घेतले. महत्वाची बाब म्हणजे ही गटशेती सातारा जिल्ह्यातील (Satara District) माणच्या पश्चिम भागातील डोंगरावरील बोथे व श्रीपालवण या गावातील (Bothe and Sripalvan village) युवा शेतकऱ्यांनी बटाट्याची शेती करून क्रांती घडविली आहे.
‘या’ जिल्ह्यात पिकतोय महागडा काळा तांदूळ, आसाममधून बियाणे आणून केला प्रयोग
त्यामुळे बोथे व श्रीपालवण या गावातील तरुणांनी बटाट्याचे उत्पादन घेऊन वेगळी ओळख निर्माण केलीय. ही बटाट्याची गटशेती करताना बोथे व श्रीपालवण या गावातील तरुणांना इतर शेतकऱ्यांसारखा देखील हवामान बदलामुळे उत्पादनात फटका सहन करावा लागला. तरीदेखील त्यांनी न डगमगता या हवामानाच्या बदलावर मात करण्यासाठी एकजुटीने बोथे येथील युवा शेतकरी गटशेतीकडे वळले. या तरुणांनी माणदेश एग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनी सुरू केली आहे.
दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमध्ये मुलीचा दोरीच्या उडीचा पराक्रम, पाहा व्हायरल VIDEO
दरम्यान ग्राहकांचा कल लक्षात घेऊन त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बटाटा उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला या तरुणांनी बटाट्याचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन (Produced organically) कसे घ्यायचे याचे मार्गदर्शन व प्रशिक्षण कृषीतज्ज्ञांकडून घेतले. त्यांनी वेगवेगळ्या अनेक प्रगतशील शेतकर्यांच्या शेतीस भेटी दिल्या. इतकंच नाही तर सर्व शासकीय कार्यालयांशी संपर्क साधून सेंद्रिय बटाट्याची माहिती घेतली. इतकंच नाही तर पाणी फाऊंडेशन टीम व कृषी अधिकार्यांनी देखील त्यांना मार्गदर्शन केले. यानंतर हे तरुण या बटाट्याच्याच शेतीकडे वळले आणि आज ते लाखोंमध्ये उत्पन्न घेत आहेत.
काय सांगताय! भारतात चक्क ‘या’ ठिकाणी भरते सापांची जत्रा, मोठ्या प्रमाणात असते भाविकांची गर्दी
बटाट्याच्या लागवडीसाठी तरुणांनी एकत्रित व एकमताने बियाणे, सेंद्रिय खते, औषधांची निवड केली. विशेष म्हणजे गटशेतीमुळे या खर्चात बचत झाली. तसेच या तरुणांनी आधुनिक तंत्रज्ञान व पारंपरिक शेतीची सांगड घालून उत्पादन घेतले. मग यामध्ये बीज प्रक्रिया, उगवण क्षमता, दशपर्णी अर्क, जीवामृत इ गोष्टींचा योग्य वापर केला. महत्वाची बाब म्हणजे कोणतेही रासायनिक खत (Chemical fertilizers) वापरले या बटाट्याच्या शेतीसाठी वापरले नाही. विशेष म्हणजे पुण्याच्या शासकीय प्रयोगशाळेतील तपासणीनंतर राज्य शासनाकडून या बटाट्यास विषमुक्त असल्याचे ‘सेंद्रिय प्रमाणित प्रमाणपत्र’ मिळाले आहे.
Shiv Thackeray: “माझ्या १६९ गर्लफ्रेंड होत्या”, शिव ठाकरेने केला मोठा खुलासा